जीवनवाटा
जीवनवाटा
क्षणार्धात आयुष्यात
वाटा वळणा अधीन
कष्ट प्रयत्न शिंपीता
यश होईल स्वाधीन ॥१॥
गुंता नात्यात विणता
मनी शत्रुत्व भावना
सुटे दोरी विश्वासाची
गर्व नाकारी सांत्वना ॥२॥
मती भ्रष्ट गर्वापायी
मोह क्षणिक सुखाचा
लोभ वासना जपता
माजे कल्लोळ दुःखाचा ॥३॥
निंदा स्तुती दारोदारी
उच्चनीच्च का दुरावा
प्रदक्षिणा वैराग्याचा
घ्यावा प्रेमाचा विसावा ॥४॥
हृदयी वात्सल्य ममता
निजे अखंड ईश्वर
काया अहंकारतून
शव होईल नश्वर ॥५॥
हरवली माणुसकी
कलियुग आले दारी
जग रे क्षणभंगुर
वैर मानवाची स्वारी ॥६॥
