गुलाबी ऋतू
गुलाबी ऋतू
1 min
64
पर्णे वाऱ्यावरी
बागडू लागली
चैतन्य वेलीनी
सृष्टी शहारली ॥१॥
धरणी फुलली
गर्द हिरवळ
शिशिर थांबता
लुप्त पानगळ ॥२॥
गुलाबी सूर्याची
छटा अवनीत
अद्भुत वसंत
निसर्ग मोहित ॥३॥
वसंत पालवी
फुलांनी नटली
मोहक सुगंध
अंगणी सजली ॥४॥
प्रफुल्लित ऋतू
मनी संचारला
मंजुळ पक्षांनी
नभ बहरला ॥५॥
