मृत्यू झोप
मृत्यू झोप
हवी अशी एक गाढ निद्रा
जी मनाला मनातून देई शांती
विचारांच्या गर्दीतून निसटून
घ्यावे मोक्षाची मोठी विश्रांती ॥१॥
प्रेमाची रडगाणे हे रोजरोजचे
वरवरची आपुलकी भासणारे
जीव हा जिवंतपणी अडकला
रहस्यमय जगाच्या विचाराने ॥२॥
काळजाच्या माझ्या ठोक्याने
काळजीने स्वतःस झुंज द्यावे
सिद्ध करावे भावनिक लढाई
मनाने कोठून पुरावे आणावे ॥३॥
आक्रोशाची भाषा आसवाची
हृदयाच्या अदृश्य जखमांवर
वाटे वेदनांची अक्षरे बोलावी
मृत्यूच्या मग कोऱ्या पानावर ॥४॥
बंधनांनी विणलेल्या जाळ्यातून
डोकावून बघते मी माझ्या मनाला
मृत्यूझोप अवचित येता झोपावे
घेऊन मिठीत माझ्या जीवाला ॥५॥
