कोरी पाटी नशिबाची
कोरी पाटी नशिबाची
1 min
153
कोऱ्या माझ्या पाठीवर
नशिबाची ही अक्षर
दुःख क्षण कवटाळे
सुखी विश्व निरक्षर ॥१॥
प्रयत्नांचा वर्षावात
यश होईना स्वाधीन
अपयश माझ्या दारी
वेदनांच्या मी अधीन ॥२॥
नाती-गोती जीवापाड
हृदयी जपून अडाणी
काल्पनिक जीवनात
प्रित नसते शहाणी ॥३॥
माणुसकी पुस्तकात
पाने कर्माचे मोकळी
स्वार्थीपणा अंगीकारे
तुटे विश्वास साखळी ॥४॥
हृदयावर कोरलेल्या
स्वप्न अर्थ उमजेना
करे नशीब लिखाण
शब्द विष समजेना ॥५॥
आभासीक मंद हास्य
ओठावरी नक्षीदार
आयुष्यात भावनांचा
बदलते कलाकार ॥६॥
