रंग मातीचा
रंग मातीचा
1 min
265
मृदा पर्जन्याने शिंपता
रंग मातीचा फुलला
त्यातील मोहक गंध
रोमारोमात संचारला ॥१॥
तृणपर्णेचा अल्लड़पणा
त्या मातीवर लोळती
दुधी झरे नागमोडी
भूमीवर मगं हर्षती॥२॥
निष्पर्ण वृक्षास करी
भूमीतून जलसिंचन
पालवी उमलती
शहारून तनमन॥३॥
जरतारीची हिरवीशालू
नेसून मृदा सजली
काळया आईला कृषिक
जणू सौभाग्य लाभली ॥४॥
रंग मातीचा जणू
आभासीक सोनेरी
दरवळती त्यावरी
मातीचा सुगंध चंदेरी ॥५॥
