कथा आम्हा पिल्लांची
कथा आम्हा पिल्लांची
1 min
137
ओल्या सरींचा वर्षानी
वसुंधरा गंधाळली
पशुपक्षी वृक्षवेली
सृष्टी सारी न्याहाळली ॥१॥
ढग दाटता नभात
पिल्ले शोधती घरटे
अवचित पावसाने
केली फजिती पहाटे ॥२॥
थरकाप झाली काया
जेव्हा वाऱ्याने घेरले
संरक्षण करे कोण
सर्वजण परतले ॥३॥
फांद्यावर चालतांना
डोईवर पान आला
इवलेसे चिमुकले
हात आश्रयास झाला ॥४॥
उमजले मज क्षणी
बाळ गोजिरी साजिरी
हरपुन देहभान
आम्हा संरक्षण करी ॥५॥
