मृगाचा पाऊस
मृगाचा पाऊस
1 min
151
सरी भेगा पाडीत नभाला
अवतरली या धरणीवरी
ओल्या सरी चुंबीता मृदा
गंध पसरला पवनावरी ॥१॥
रिमझिम अशी नृत्यकला
करीत आली पाऊसधारा
गुंजारुन मग या धारेस
पिंगा घाले अल्लड वारा ॥२॥
घेऊनी सूर्याची सप्त छटा
रेखाटले इंद्रधनुष्य नभांगणी
स्वर्गीय मनमोहक दृश्याचे
प्रतिबिंब साऱ्यांच्या अंगणी ॥३॥
टिपटिप हे सरगम गीत
मंत्रमुक्त करून हर्षिले मन
सुरांच्या काहूर वर्षावाने
न्याहाळली वसुंधरेचे तन ॥४॥
कुंदकळ्या अन् पर्णानी
भिजली सारी ही सृष्टी
मृगाचा पाऊस हा जणू
करे चैतन्याची वृष्टी ॥५॥
