साहित्यातून समाजसेवा
साहित्यातून समाजसेवा
साहित्यातून समाजसेवा
कस्तुरीसम दरवळावे
भावनांच्या मृगजळाचा
विश्वात गंध संचारावे ॥१॥
उनाड शब्द वाऱ्यांना
जकडते यातनांचा तुफान
लेखणीच्या प्रहाराने
बहरती आत्मिक मन ॥२॥
तुकोबांच्या अभंगातून
मानवतेचा पाझर फुटले
गगनातील चांदण्यांना
कवींनी कवितेत शिंपले ॥३॥
परंपरांच्या गर्द काळोखात
संविधानाचा लख्ख प्रकाश
बहिष्कार करे कुप्रथांवरी
समाजास दिसे मुक्तआकाश ॥४॥
कादंबरीत प्रेम गुच्छ
हास्याची फुले उमलती
निष्पर्ण दुःख भावनांवरी
कवितेची तृणपर्णे खेळती ॥५॥
पोवाड्यांचे अग्नीडाग
हुतात्म्यांच्या राखीनवर
आहूतीची प्राणज्योती
तेवे धारधार लेखणीवर ॥६॥
चारवेदानी विश्व संचारलं
परीधानली आत्माची शाल
दिशाभूल ध्येय आयुष्यात
रोवली मानवतेची मशाल ॥७॥
साहित्यातून समाजसेवा
पानांवरती विश्व सोहळा
पावलापावलांवर मिळे
साहित्यिकांचा मेळा ॥८॥
