जीवनगाणे आयुष्याचे
जीवनगाणे आयुष्याचे
कधी सुखाचे तर कधी दुःखाचे
जीवनगाणे मी गात असतो
दररोज नवीन एक अनुभव
आयुष्यात असा घेत असतो
वाटेवरती कधी असतात फुले
तर कधी असतात टोकदार काटे
सुगंध घ्यायचा आयुष्याचा पण
मनात नेहमी भीतीने हुरहूर वाटे
जगण्यासाठी सामर्थ्य पाहिजे
विसरून अनेक त्या अडचणी
सहवास हवा असतो सोबत
या उजाड अनोळख्या माळरानी
शिकावंसं वाटतं बरंच काही
उंच झेप घेणाऱ्या पाखरांकडून
वाटेतला कचरा बाजूला सारून
वाहणाऱ्या निर्मळ नदीच्या पाण्याकडून
सारा खडतर प्रवास विसरून
नेहमी पुढेपुढे जायला पाहिजे
धैर्याने तोंड देऊन आव्हानाला
जीवनगाणे आयुष्याचे गायला पाहिजे
