STORYMIRROR

Raakesh More

Classics Inspirational Others

3  

Raakesh More

Classics Inspirational Others

जीवनाचं गाणं इथे

जीवनाचं गाणं इथे

1 min
141

जीवनाचं गाणं इथे 

गाता आलं पाहिजे 

निखाऱ्यावर चालून इथे 

जाता आलं पाहिजे || 0 ||


दळून जाती मानवजात 

या नशिबाच्या जात्यात 

किती छटा या जीवनाच्या 

बाण अनेक या भात्यात

बाण राखण्या बनता इथे 

भाता आलं पाहिजे || 1 ||


रंग किती हे जीवनाचे 

सुस्त आणि नटखट 

किती चवींचे क्षण इथे हे 

रुचकर आणि कडवट 

स्वादिष्ट या अनुभवा 

खाता आलं पाहिजे || 2 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics