जीवन !
जीवन !
अंधार आहे म्हणूनि
तेजास मान आहे
ही रात्र इथे आहे
आणि दिवस आहे
आवाज नाद आहे आणि
जग शांत आहे
नसती जर निशा
होऊनि असह्य दाह
फुटल्या असत्या
दाही दिशा !
नुसतीच असती निशा
तर शीत लहरीत
गोठूनी गेल्या
असत्या दिशा !
आहेत ऋतु सहा
म्हणुनी रुजुवात आहे
असता नुसताच वर्षाव
जग कुजून गेले असते !
असता नुसताच ग्रीष्म ?
जग भाजून मेले असते !
समग्र संतुलनाने
धरती सम्रुद्ध आहे
नवरस आहेत आणि
प्रत्येक रसाचा
आगळाच स्वाद आहे !
आहे जे जे ब्रम्हांडी
ते ते पिंडी पिंडी !
घ्या बोध यातून तुम्ही
संतुलन साधा !
तुमच्या मनातही
देव आहे मानव आहे
दैत्य आहे !
घ्या बोध राखा संतुलन
मानवेल तितुकेच घ्याना
मानव बना मानव रहा !
जे खरे जीवन आहे !
