STORYMIRROR

Deore Vaishali

Inspirational

3  

Deore Vaishali

Inspirational

जीवन

जीवन

1 min
168

उगाच मनी खंत येते,

बेचैन ती करुन जाते,

आठवणींची उजळणी,

मग वजाबाकी सुरू होते.....


हिशोब मांडत बसते 

मन त्या सुख दुःखाचा,

वाया गेलेल्या घडीचा,

आपल्या चांगुलपणाचा....


एकाकी पडतो जीव,

उने होते सारे सुख,

यातनाचीच असते पंगत,

अनुभव नसतो गाठिला....


गुणाकार व्हावा जीवनात,

धडपडत असतो जीव,

कर्मावर ती हसणारे,

देतात दिखाव्याचा हुरूप....


ठेच लागते,घाव उमटतात,

बेरीज होते हळूहळू,

कधी उणे तर कधी अधिक,

 हा खेळच जीवनाचा जणू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational