जीवन याचे नाव असे
जीवन याचे नाव असे
चंद्राप्रमाणे शीतल भासे
त्यावर मात्र खाचखळगे असे
डोंगर अडचणींचा करता पार
दुसरा डोंगर समोर असे
जीवन याचे नाव असे
चांगली कपडे परिधान करता
तेव्हाच धो धो पाऊस बरसे
मुलाचा on line paper असता
तेव्हाच मोबाईलचा डिसप्ले फुटे
पाहुणे आप्तेष्ट घरी येता
तेव्हाच बरोबर दुध नासे
कामासाठी घाईत निघता
तेव्हाच गाडी पंक्चर दिसे
लवकर जायचे असते घरी
तेव्हाच कामाचा ढीग असे
कोणतेही घेता काम हाती
तेव्हाच अडचण येते कशी
हीच तर जगण्याची गंमत असे
