STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

3  

Chandan Pawar

Tragedy

जीवन वळणवाट

जीवन वळणवाट

1 min
11.3K

आपले कोण परके कोण

कोडे कधी उलगडले नाही.

        

          नात्यांचे रेशीमबंध गुंफतांना

          ऋणानुबंध कधी जुळले नाहीत.


संकटांना सामोरे जातांना

मागे कधी वळलो नाही.


           सुखाचे चार क्षण जगतांना

           गर्वाने कधी हुरळलो नाही.


स्वतःपेक्षा दुसऱ्याला जपतांना

मनासारखं कधी जगलो नाही.


           यशाची पायरी चढतांना

          अपयशाला कधी विसरलो नाही.


तीव्र वेदनेच्या रानात पोळतांना

नशिबावर कधी हळहळलो नाही.


           जीवन वळणवाटेवर चालतांना

           ठेचाळून कधी पडलो नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy