STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

4  

Pandit Warade

Tragedy

विंचू

विंचू

1 min
16.6K


सुरक्षित ना माता भगिनी ना कुणी तयांचा वाली

राजरोस लुटल्या जाती रस्त्यावर लेकीबाळी ।।१।।


रस्त्यावर सुंदर बाला केसात माळूनि गजरा

करी सर्वांगा घायाळ वख वखत्या गिधाडी नजरा ।।२।।


खांद्यावर ज्यांच्या मान टाकावी विश्वासाने

विश्वासघात करावा का त्या पवित्र बंधू पित्याने? ।।३।।


वासनेने आंधळा झाला नजरेत भोगच भरला

नात्याचेही भान सुटले अंगात सैतान शिरला । ४।।


प्रेमे फिरणारा हात का हो वासनेने बरबटला

काम पिशाच्च मनी भरला साराच तोल सुटला ।।५।।


कन्येशी कुकर्म करतो हा असला कसला बाप

वासनांध नरपशू हा केवळ विषारी साप ।।६।।


हा एक नव्हे अनेक जसे विंचू दगडाखाली

रांगेत उभे करोनि घालावी एकच गोळी ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy