शेवटचा सामा
शेवटचा सामा
काय सांगावी कर्माची कथा
वाहून गेल आमच सर्व पुरात वाडा
लेकरासारख बैल आमचे गेले वाहून
वाहतो आम्ही दोघे मिळून गाडा ।।
सुख दुःखाची असे ही जीवन यात्रा
जगण्यासाठी कष्ट ही करूनी
डोळ्यात आसवं घेवून दरदिनी
खातो ही दोघे भाकर भाजूनी ।।
संगतिला जोडीदार आहे
तेवढाच आधार आहे नशिबाचा
जसे जीवन दिले तसे दिस काढून
धन्यवाद आम्ही करतोय देवाचा ।।
या देखण्या भरल्या जगात
कोणी नाही रे कोणाचा
कंबर कसून ध्येय बोलावून
बोजा उचलावा आपल्या संसाराचा।।
पाखर झाली मोठी गेली उडून
आशेन करतो पाई पाई जमा
येतील कधी तर देवू भरवून
नाही आले तर होई शेवटचा सामा ।।