STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

3  

Shila Ambhure

Fantasy

जीवन संगीत

जीवन संगीत

1 min
442




माझे तुमचे जीवन

अनमोल असे दान.

मिळणार ना फिरुनी

सदा ठेवा हेचि भान.


उधळावे आनंदाचे

रंग मजेचे आगळे.

लपवुनि दुःखरेषा

हसू फुलवा आगळे.


घ्यावे हिंदोळे खुशीत

झुलवावे स्वप्न झूले.

बहरावे असे धुंद

लाजतील गोड फुले.


गरजूंना द्यावे अन्न

तहानलेल्यास पाणी.

चिंता नसावी कशाची

गावी ही जीवनगाणी.


दूर होईल निराशा

छेडा अशी हास्य तान.

दुःख घेईल माघार

गाता आशेचे ते गान.


समजावे आयुष्य हे

चित्र सुंदर रंगीत.

मुक्तकंठे गाऊ सारे

असे जीवन संगीत.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy