STORYMIRROR

Pandit Warade

Classics Others

3  

Pandit Warade

Classics Others

जीवन प्रवास

जीवन प्रवास

1 min
456

सुखाचे दुःखाचे

ऊन  पावसाचे

एका पेक्षा एक

क्षण जीवनाचे


लटकी भांडणे

लटके  रुसणे

आनंदात कधी

प्रसन्न  हसणे


अहम भावना

कधी प्रसवते

रेशीम बंधाची

वीण उसवते


शब्द अचानक

हत्यार  बनते

हृदय कुणाचे

जखमी करते


कधीच कुणाची

नको उणी दुणी

दुःखीकष्टी कधी

होऊ नये कुणी


असो  प्रसन्नता

जीवनात खास

सुखात चालावा

जीवन  प्रवास



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics