STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

जीवन प्रवाह...!

जीवन प्रवाह...!

1 min
1.2K


जीवन प्रवाह....!!!!


जीवन प्रवाहात माझ्या

अनेकविध प्राणी

आपोआप आले

आपोआप गेले


जाता जाता मजला

अनुभवासह अमूल्य

ज्ञानामृत पाजून

सहजी दूर निघून गेले


प्रवाही जीवन माझे

प्रवाहीच राहिले

कोठे कधीही ते

मध्येच नाही आडले


नदीचे पाणी जसे

तसे जीवन गोड राहिले

वाहते ठेविले अनंते

म्हणून ते तैसेचि राहिले


सागराची ओढ मोठी

आस धरून होती

तरीही मी ती कधी

पुरी नाही होऊ दिली


सागरी मिलन होता

गोडवा विरून जातो

जणू मिठागराचा

खारवा जीवन व्यापून टाकतो


खाच खळगे लागले

तरी ओलांडून ते वाहिले

कधी नाही साठून

त्याचे डबके होऊ दिले


डबक्यात जीवनाच्या

कोंडून कशास घ्यावे

वाहते प्रवाही राहुनी

वाटले जीवन गोड जगावे


जैसे रेखिले तैसे

आजवरी आनंदाने वाहिले

खरेच जीवनी आम्ही

सौख्याचे अनेक क्षण पाहिले


प्रवाह जीवनाचा असा

अखंडित वाहताच राहू दे

देवा तुझ्या कृपेने

तो असाच ओसंडून वाहू दे.....!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational