STORYMIRROR

Gajanan Pote

Inspirational

3  

Gajanan Pote

Inspirational

जिद्द जिंकण्याची

जिद्द जिंकण्याची

1 min
414

लाचार मज ना समजावे कोणी 

जिंकण्याची जिद्द आहे अजून मनी ।।

जरी शून्य असेल आज मी 

उद्याचे विश्व निर्माण करील मी।।

चलतीची असली दुनिया जरी ही

मी हताश होऊन थांबणार नाही ।।

उतरेल कसोटीस खरा 

हरल्यावरही ठेवील चेहरा हसरा ।।

अश्रूंना डोळ्यात जागा राहणार नाही 

स्वप्नांना साकार करण्यास मागे हटणार नाही ।।

अपमानाचे घोट पित जाईल 

आनंदाने कार्य माझे पार करीत राहील ।।

आत्मविश्‍वास हाच असे माझा सोबती 

संकटांची कधीही ठेवणार नाही भीती।। 

गर्दीत जरी असलो मी एकटा 

शोधून काढली आनंदाच्या वाटा।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational