झुगारा अंधश्रद्धा
झुगारा अंधश्रद्धा
अंधश्रद्धा अंधपणे, मनावर आरुढ
सारासार विवेकाचे, झुगारुन पांघरुण (1)
पगडा इतका घट्ट, मनाला पडे विळखा
नकळत करे हट्ट, विचाराला देती फाटा (2)
कोणी नवस देवाला, कोणी घाले प्रदक्षिणा
देई बळी पशूला, तर कोणी मानवाला (3)
बळी देण्याने का देव, प्रसन्न आपणा होई?
अश्राप मारुनी जीव, मनोरथ पूर्ण होई? (4)
देव प्रसन्न होतसे, निरपेक्ष कर्मातून
बळीची नसे अपेक्षा, घातकशा प्रथेतून (5)
झुगारुन टाका अशा, अंधश्रद्धा मनातून
विवेकी विचारांचाच, लगाम घ्यावा बांधून (6)
विज्ञानाधिष्ठित देश, सुविचारी हो जनता
डोळस श्रद्धा ठेवावी, हवी प्रत्यक्षप्रमाणता (7)
डॉक्टर दाभोळकरांनी, मतपरिवर्तन केले
भगीरथ प्रयत्न केले, प्राणांचेही बलिदान दिले (8)
एकविसावे शतक, अंधश्रद्धा झुगारेल
विज्ञानाधिष्ठित देश, प्रगतीपथ गाठेल (9)
