झोपवते आई..!!
झोपवते आई..!!
आकाशाच्या चांदण्यात
चंद्र छोटा होत जाई
लेकराला खांद्यावर
झोपवत असे आई
नटखट बाळराजा
नसे झोपण्याची घाई
सारे प्रयत्न हरले
किती झुलवावे बाई
रात्र चढत जातसे
अन् जागतसे माई
नेत्र झोपाळले तिचे
बाळासाठी गाणे गाई
