झगा चांदोबाचा
झगा चांदोबाचा
चांदोबाचा झगा
दिसतो किती छान!!
देशिल का ग आई
असलो मी जरी लहान!!
ढगात कसा फिरतो
झगा घालून चांदोबा!!
मला ही फिरायचे
ऐका ना हो बाबा!!
दुडदुडू धावतो
चांदोबा सर्वत्र!!
झगा कसा चमचम करतो
चांदण्या घेऊन एकत्र!!
मलाही हवा असाच
झगा सुंदर चांदण्यांचा!!
इकडून तिकडुन बागडायला
झगा माझ्या चांदोबाचा!!
नको आता खेळणी
हवा मला झगा!!
चांदोबाचा झगा हवा
नाही तर रुसेन मी बगा!!
आई तू किती छान
शिवलास मला झगा!!
चांदोबासारखा फिरेन मी
झगा माझा झगमगा!!
