झेप उत्तुंग यशाची
झेप उत्तुंग यशाची
घेऊ उंच ती भरारी
सखी,हसतखेळत
गुंफूनिया हाती हात
प्रोत्साहन अंथरतं... ॥१॥
जपू भाव भावनांनी
मने हळव्या क्षणात
एकमेका सावरून
हर्ष आणू स्त्रीजगात.... ॥२॥
झेप उत्तुंग यशाची
आता बघ घ्यायचीय
उणीवांना शमवित
प्रगल्भता द्यायचीय..... ॥३॥
तमा नसेल जीवनी
साथ सखीची असेल
आयुष्याची चढाओढ
सहजचं हि संपेल...... ॥४॥
युद्ध अपुले दोघींचे
संगतीने गं जिंकूया
घेऊ उंच ती भरारी
नभ निळेही पाहुया....॥५॥
जग म्हणेल पहाना
तिची उत्तुंग भरारी
एकात्मिक साखळीने
नारी दिसतेय भारी......!!६!!
