झड
झड
दडी मारली पावसाने तरी आठवणी आहेत ओल्या,
भावनांच्या आसवांतून किती झडी झाल्या!
मळभ दाटून आले मनी काळोखही पसरला,
ढगांमागून मधेच एक प्रकाश कवडसा ओझरला!
आत पाऊस-बाहेर पाऊस दुथडी भरून प्रसवला,
गंध मात्र मातीचा चहूकडे दरवळला!
