झाकला चेहरा
झाकला चेहरा
झाकला चेहरा, झाकला आरसा
लोपला जायचा तू कधी ना असा
याद येता तुझी आसवे लोचनी
घेतला रातभर जागण्याचा वसा
ही धरा, सुंदरा त्रासली, पोळली
वाट आता किती पाह्यची पावसा
व्यर्थ मोठेपणा, मान, सन्मानही
एक दिस व्हायचा बघ तुझाही ससा
ठाव आहे रिते यायचे, जायचे
मग धनाची कशाला मनी लालसा
