STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

झाडे

झाडे

1 min
251

आज आठवले ते झाड मला माझ्या अंगणातले

 त्याची ती छाया, सुगंधित फुले मनाला भुरळ पाडणारे☺️  


सकाळी उठल्यावर पावले नकळत झाडांकडे वळतात माझ्यासारखे अनेक लोक आनंद असाच तर शोधतात  

रोज त्यांच्यातले बदल प्रखरतेने दिसतात डोकावणाऱ्या गुलाबापासून मोगऱ्या पर्यंत सगळे जणू बोलतात🌸 


 रखरखीत उन्हात वाटसरूंना देतात थंडगार सावली

पक्ष्यांचा निवारा घरटही त्यात  

झाडावरच पाखरांची शाळा,त्यातच असते फळांची रास 

 पक्षी परतती घरट्यांमध्ये चोचीत घेऊनी दाणा🐦 

पिल्लासोबत निजतात सारे जणू मायेचा हा नजराना 

ऊन, वारा, पाऊस थंडी सार काही सोसत अबोल असून खूप काही बोलत🤗

  

किती सोशिक असतं झाड 

सारं काही सामावून घ्यायची सहन करण्याची शक्ती असते त्यात तरीही इतरांना आनंद देतं पतझडीच्या पानगळतीच रूप त्याचं बघण्यासारखं 

श्रावणसरी नंतरच बहरलेलं हिरव्यागार मखमलीसारखं ... 


समतोल पर्यावरणाचं राखतात 

धूपही जमिनीची थांबवतात  

फळे पाने फुले फांद्या ही उपयुक्त  


त्याच्या मुळातच अटल खंबीरता

फांद्यांमधून दिसते आधाराची क्षमता  

झाड आपल्याला त्यांच्या निसर्गसौंदर्याने मोहवितात  

किलबिलणारी पाखरं त्यावरील नकळत कधी उडून जातात 

सुन्या झाल्या घरट्यात मग आठवणी मागे उरतात

 एखादं हळवं पाखरू अधून-मधून भेटत झाडास अन् होत राहतो पानगळती तिही झाडाला बहरल्याचा आभास  

ऋतूंचे असे बदलणारे सोहळे झाड निरंतर साजरे करते गळणाऱ्या प्रत्येक पानांमध्ये स्वप्न 

वसंताचे फुललेले दिसते 🍃☘️🌿 

पण.....

माणसांच्या गर्दीत एक गोष्ट मात्र हरवली 😌

झाडे ही विलुप्त झाली

 त्याने लाखमोलाची दिलेली संपत्ती आपण कवडीमोलाने उधळली...😌


 "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" हे म्हणण्यापेक्षा आपणच एक पाऊल पुढे घेऊ या

 इतर कोणी करेल हे म्हणण्यापेक्षा आपण एक झाड लावू या 

सुंदर आहे ही धरा त्याची काळजी घ्यावी जरा

 निसर्ग आपला मित्र सखा पडतो उपयोगी अनेक वेळा

 हेच देतात प्रेरणा जगण्याची, देतात एक नवी उमेद 

 यांच्याकडे बघून बिकट परिस्थितीत ही  

आनंदाने जगायचे लागतात वेध...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational