STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

झाड आणि पर्यावरण

झाड आणि पर्यावरण

1 min
217

एक छोटसं रोपटं....

मान धरुन उभं राहिलं.....

पानांनी डवरलं....

आणि खुदकन् हसलं....


बघता बघता झाड झालं.....

पानं फुलं फळांनी बहरलं...

आल्यागेल्यांना सावली

देऊ लागलं....

पर्यटकांचा आनंद अनुभवू लागलं......

कधी कधी खूप लोकं यायची....

रोपं लावायची.......

फोटो काढायची......

त्याची फळे खाऊन तृप्त व्हायची....

आणि बरोबरही घेऊन जायची......


एक दिवस अचानक जोराचं

चक्रीवादळ झालं.......

छोट्या रोपांनी मान टाकली..

मोठी झाडेही उन्मळून पडली......

खूप लोकं आली....

भोवती गोल काढून निघून गेली......

काहींच्या गोलात बरोबर...

तर काहींच्या आत फुली

मारलेली.....

फुलीवाला ट्रक निघून गेला.....

हाय.....थोड्याच वेळात

 दुस-या ट्रकमधे दाटीवाटीनं कोंबलं......

तेव्हा मनात भय दाटलं....

निर्मनुष्य , ओसाड जागी 

झाडाला पुन्हा रुजवलं गेलं.......

झाडाने आजूबाजूला भयचकित मुद्रेने पाहिलं.......

तिथली पूर्वीची झाडं म्हणाली " नवीन आहेस!!

रुळशील हळूहळू. जग असंच असतं.

नशीब समज तुला इथे पुन्हा रुजवलं तरी!!"........

इथे रुजल्यावर तू मोठा वृक्ष होशील. .....

लोकांना सावली देशील. .........पर्यावरणाचा समतोल साधशील.......


झाड खिन्नपणे विचार करु लागलं......

आधीच्या ट्रकमधील झाडं केव्हाच जमीनदोस्त झाली असतील....

ही स्वार्थी माणसं खसाखसा लाकडं ओरबाडंत असतील.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract