जगणं
जगणं
फुलायचं फुलासारखं
आतून बाहेरून
वाहायचं वाऱ्यासारखं
सर्व थरांतून
नितळ झऱ्यासारखं
झरत रहायचं
पिंपळ पान होऊन
झुलत राहायचं
झाड होऊन आपण
उन्हात उभं राहायचं
सावलीचं कारण होऊन
पांथस्थाला सुखवायचं
मेघ होऊन निळा-सावळा
अलगद मातीत उतरायचं
हिरवं हिरवं करत सारं
आपण हिरवं व्हायचं!
