STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

जगणे त्यांचे सुकर व्हावे....

जगणे त्यांचे सुकर व्हावे....

1 min
415

तुमचे तुम्हास लखलाभ

फक्त द्या हो आमुचे माप

हात जोडुनी हेच मागणे 

जगणे आमुचे सुकर व्हावे


थांबवा आता कोरडे आश्वासने

अन्न वस्त्र निवारा द्या आता 

समजू नका हो जनता खुळी

भरू द्या त्यांना टीचभर पोटाची खळगी


अजून कुठवर मूर्ख बनवाल त्यांना

अंत नका हो त्यांचा पाहू

भ्रमिष्ठासारखा प्रवास त्यांचा

हताश जनतेची वेळ हातावर आलेली


हेवे दावे विसरुनी सारे एक व्हा रे

लोकशाहीचा राजा मारू नका रे

लबाडीच वागणं सोडून द्या रे

तुमचाही शेवट गोडं व्हावा 


कोरभर तुकडा अंगभर कपडा, निवारा 

नको त्यांना अजून आणखी काही

हेच मागणे करा विधायक असे की

जगणे त्यांचे सुकर व्हावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational