जगावे प्रेमाने
जगावे प्रेमाने
वारे प्रीतीचे वाहू द्या रे
रंग प्रेमाचे बहरू द्या रे
गंध प्रीतीचा दरवळू द्या रे ।।
सुख दुःख वाटून घेऊ सारे
झुळूक हवेची होऊन जगा रे
सुर्यासम प्रकाश देऊन बघा रे ।।
फुलपाखरू होऊन स्वछंदी जगावे
क्षण आनंदाचे द्यावे आणि घ्यावे
चंद्रासम चांदण्याशी खेळावे ।।
पाऊस होऊन बरसावे
प्रेम शोधावे प्रेम बघावे
सर्वत्र प्रेम पसरावे।।
