जगणं म्हणजे काय?
जगणं म्हणजे काय?
आयुष्य प्रत्येकालाच मिळतं
पण खूप कमी जणं त्याला जगतात
साऱ्यांच्या डोळ्यांना आनंद पाहण्याची आस असते
पण खूप कमी डोळे असतात
जे दुसऱ्यांचे अश्रू बघतात
आयुष्य म्हणजे,
माणसाला माणसाशी जोडून ठेवणारी दोरी
आयुष्य म्हणजे,
माणसाला स्वतःची ओळख करून देणारी जबाबदारी
आयुष्य म्हणजे,
उपकाराची जाण
आयुष्य म्हणजे,
यशाची तहान
मान्य आहे, आयुष्य म्हणजे खुप कष्ट
पण त्या कष्टालाही एक सीमा असते
दगडाची पुजा करुन यश मिळत नाही
यशामागे प्रयत्नांचीच कथा असते
पण या प्रयत्नांतही प्रामाणिकपणा असला पाहिजे
आयुष्य जगताना मात्र माणुसकीचा
भाव दिसला पाहिजे.
