STORYMIRROR

lajwanti kute

Drama Classics

2  

lajwanti kute

Drama Classics

वडील

वडील

1 min
41

चिमुकल्या हाताच बोट धरून चालायला शिकवतात

कोणाचे बाबा तर कोणाचे अण्णा, कोणाचे आप्पा

जग पारखून ,ओळखून आणि समजून जगायला शिका

हिच शिकवण देतात नेहमी मला माझे पप्पा


मुलाच्या जन्मापासूनच साठवत असतात ते आयुष्याची शिदोरी

नाही म्हटली तरी त्यांच्याच हातात असते कुटुंबव्यवस्थेची प्रत्येक दोरी


चेहऱ्यावर राग,संयम ,शांतता आणि मनाच्या एका कोपर्यात थोडासा हळवेपणा

आपला आनंद दुसऱ्या घरी हसून देतात न जाणे कुठून येतो हा समजूतदारपणा


कुटुंबाला त्रास नको म्हणून काट्यांवर स्वतः चालण

मुलांना सावली हवी म्हणून उन्हाची झळ स्वतः सोसण


त्यांना उत्तम शिक्षण देऊन स्वतःची स्वप्न अर्धी ठेवण

छोट्या छोट्या गोष्टीतही आधी कुटुबांचा विचार करण


रितीप्रमाणे तुला आद्य स्थान देत नाही म्हणून माफ कर बाप्पा

संकटात डोळे बंद केल्यावर सुरवातीला मला माझा देव दिसेल,माझे पप्पा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama