STORYMIRROR

lajwanti kute

Abstract Classics

2  

lajwanti kute

Abstract Classics

मी कविता करते

मी कविता करते

1 min
20

अस्तित्वात उतरल्या सारखे भासते

माझ्या स्वप्नातले गाव

जेव्हा मी कविता करते

कल्पना तर सुचतात च

पण कल्पनांना मिळतो वाव


जेव्हा मी कविता करते

जगाच्या धावपळीत हरवणारी मी

सापडतो माझ्यात दडलेला भाव


जेव्हा मी कविता करते

जणु चंद्र तारे माझ्याकडेच पाहतात

नकळत मनात कल्पनांचे वारे वाहतात

नकळत मी स्वतःत गुंतत जाते

नकळत अश्रु आनंदात बदलून जातात


जेव्हा मी कविता करते

कधी कधी सारे आभाळ लहान होते

कधी कधी हळव्या नात्यांचे भान होते

कधी नकळत मिळते एकटेपणात सोबत

कधी कधी मनाचे रान बेभान होते


जेव्हा मी कविता करते

असंख्य लाटामध्ये मी एकटी समुद्राप्रमाणे होते

लाखो ताऱ्यांमध्ये मी एकटीच चंद्राप्रमाणे होते


कोणास ठाऊक

ही अनोळखी सोबत मला लाभली कशी

कोण जाणे

या छंदाची गोडी मी चाखली कशी

फक्त एवढच कळतय

कि प्रत्येक क्षणाला जगावस वाटत


कारण मी कविता करते

आजकाल तर दुःखाकडेही

आनंदाने बघावस वाटत

कारण मी कविता करते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract