STORYMIRROR

lajwanti kute

Tragedy Classics Others

2  

lajwanti kute

Tragedy Classics Others

ती

ती

1 min
86

ती त्याच्या अन तिच्या स्वप्नात हरवली

त्याने क्षणात तिच्यासमोरच ती सारी तोडली


त्याच्याकडे असणाऱ्या वाईट नजरांसमोर ती उभी राहिली

त्याने मात्र दुसरीचीच दुष्ट काढली


ती रात्र रात्र त्याच्यासाठी जागली

पण त्याने त्याची सकाळ दुसरीसोबतच सुरू केली


त्याला होणारा त्रास बघून तीही रडली

पण त्याच्यासाठी काही क्षणातच ती कायमची मेली


प्रेमाची सुरवात त्याने केली मग लग्नाची स्वप्न तीने पाहीली

त्याने त्याच्या नावाची काळीदोरी गळ्यात दुसरीच्याच घातली


तिने रोज देवाजवळ त्याच्यासाठी सगळी सुख मागितली

त्याने मात्र कौतुकाची शिदोरी दुसरीच्याच पायापाशी वाहिली


पराकोटीच्या वेदना तिच्या मनाला झाल्या

तो मात्र त्याच्या नव्या आयुष्यात रमला


एका मुलीच आयुष्य बरबाद होईल म्हणून ती शांत बसली

त्यासाठी अर्धांगिनी दुसरी अन ती मात्र callgirl ठरली


जग जिंकूनही ती स्वतःशीच हरली होती

कारण त्याने तिच्यासमोरच दुसरीसोबतच सप्तपदी घेतली होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy