STORYMIRROR

lajwanti kute

Drama Others

3  

lajwanti kute

Drama Others

माझी आई माझे बाबा

माझी आई माझे बाबा

1 min
249

माझ्या आयुष्यात असे दोन झरे आहेत

ज्यांच्या प्रेमात मी सहज वाहते

भाग्य आहे माझे

त्यांच्या सहवासात मी राहते.

त्यांच्यामुळे हे सुंदर विश्व मला मिळाल

त्यांच्यामुळेच या आयुष्याच महत्व कळालं

त्याच्यांसाठी आहे ह्रदयात

एक वेगळीच जागा

माझ्यासाठी जग माझे

माझी आई माझे बाबा

उदास होतात तेही

जेव्हा मी उदास होते

नेहमीच ते माझा

मी त्यांचा श्वास होते

फक्त तेच ठेऊ शकतात

माझ्या आयुष्यावर ताबा

माझ्यासाठी जग माझे

माझी आई माझे बाबा

उपकार नेहमीच असतील त्यांचे

आयुष्याच्या कोऱ्या पाटीवर त्यांनी नाव माझ लिहिलय

संकटात जेव्हा डोळे बंद केले

तेव्हा प्रत्येकवेळी त्यांनाच समोर पाहिलय

ते देवाचे रुप आहेत

हे ओरडून सांगेल मी नभा

माझ्यासाठी जग माझे

माझी आई माझे बाबा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama