मी
मी
समुद्राच्या लाटा मी
अवखळ अश्या वाटा मी
आयुष्यात थांबावस वाटत नाही
जणू घड्याळाचा काटा मी
बेधुंद वारा मी
पावसाच्या धारा मी
अनेक स्वप्ने येऊन बसतात डोळ्यात माझ्या
जणु स्वप्नांचा निवारा मी
बावरलेले क्षण मी
ओथंबलेले मन मी
रुजवा अनेक विचारांची रोप माझ्यात
एक खुले अंगण मी
मला माझ्यातल्या मला
कुठेतरी दडवायच नाहीये
स्वप्नांकडे पाठ करून
स्वतःला अजून रडवायचं नाहीय
जेवढी मी स्वतःमध्ये हरवते
तेवढीच मी सापडते मला
माझ्यातली हिच जादू तर
आवडते मला....