मी..
मी..
हरवुनी पुन्हा मी हरवते तुझ्यात,
स्वप्नांना साद मी घालते उरातं.
लावून पंख मी विहरते नभात,
डोलते मौजेने अल्लड वाऱ्यात.
घेऊनी गिरकी मी नाचते भरात,
छुमछुम पैंजण तसे वाजे पायांत.
छेडून सूर मी गाते लयात,
झंकारते प्रीत तशी हदयातं.
आठवूनी तुला मी शब्द रचते विरहात,
अलवार तसे काव्य कोरते मी मनात.

