STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Romance Fantasy

3  

Ganesh G Shivlad

Romance Fantasy

मनात आलं सहज

मनात आलं सहज

1 min
256

मनात आलं सहज आज 

तुला एकदाच भेटावं..!

होत नव्हत सारच काही 

मनातलं तुला सांगावं..!

डोळे भरून सारी रात 

आज तुझ्याकडेच पहावं..!

निळ्याशार डोळ्यांत तुझ्या 

भान हरपून रंगावं..!

रेशमी केसात तुझ्या 

आज मोगऱ्याला माळावं..!

नाजूक तुझ्या ओठांना 

एक गुलाब दान करावं..!

ह्रदयात माझ्या नेहमीसाठी 

तुला जपून ठेवावं..!

हेच तुला सांगण्यासाठी 

वाटतं एकदाच भेटावं..!

मग भेटशील ना......???


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance