मैत्रीण
मैत्रीण
एक तरी मैत्रीण असावी...
मनाच्या कोपऱ्यात अलगद बसावी...
मी-तू पणाची भावना आमच्यात कधीच नसावी...
हेवे-दावे,मान-पान यांना मैत्रीत जागा नसावी....
खुले असावे नाते, व्हाव्या मनमोकळ्या गप्पा...
अलगद उघडला जावा मनाचा नाजूक कप्पा...
हवी आहे मजला अशीच एक सखी....
माझे नाव तीच्या अन तिचे नाव माझ्या....असावे सतत मुखी...
न बोलता समजून घेऊ आम्ही एकमेकींच्या भावना....
नकळत समजतील आम्हाला एकमेकींच्या यातना....
आयुष्याची जरी सरली एवढी वर्ष....
तरीही अशा ह्या सखीची जागा अजूनही आहे रीक्त...
भेटेल जेव्हा ती मला, काय सांगूं केवढा होईल हर्ष...
हक्काने होऊ शकेन मी तिच्याजवळ व्यक्त....
आजपर्यंत अनेकांच्या ऐकल्यात मी सुख-दुःखाच्या कथा...
पण कोणालाच नाही वेळ,ऐकायला माझ्या मनीची व्यथा....
ह्या वेड्या मनाला आहे अजूनही आस...
कधी भेटेल मला माझी सखी ती खास...
मैत्री दिनाच्या वेळेस मात्र या विचारांनी होतो खूप त्रास...
जेव्हा तिची-माझी होईल भेट,तोच दिन असेल माझ्यासाठी मैत्री दिन खास....
ऐकून माझी ही कहाणी, नकळत बोलली एक वाणी..
असता तूला हे कन्यारत्न, आणू नकोस डोळ्यात पाणी..
तीच होईल बघ तुझी सखी, अन जाणून घेईल तुझी व्यथा...
ऐकता हे बोलणे, मनास आली परत उभारी...
अन खरोखरच आमची मैत्री झाली सर्वांपेक्षा न्यारी....
माझी प्रिय सखी झाली माझीच लेक प्यारी....
