STORYMIRROR

Deore Vaishali

Fantasy

3  

Deore Vaishali

Fantasy

मलाही कधीतरी वाटतं

मलाही कधीतरी वाटतं

1 min
178

मलाही कधीतरी वाटतं,

विचारी मनाला शांत करावं,

 दुःख डोळ्यात थिजवून,

गालावर हसू फुलवावं....


मलाही कधीतरी वाटतं,

आठवणींचा खजिन्यासोबत,

आनंदात मनाला रमवावं,

हरवलेल्या क्षणाना पुन्हा अनुभवावं...


मलाही कधीतरी वाटतं,

कोणीतरी सोबतीला असावं,

मनातलं मळभ सार,

त्यांच्या सोबत वाहुन टाकावं...


मलाही कधीतरी वाटतं,

कासावीस मनाला आवरावं,

ओघळणारे अश्रू ते अलगद,

कोणीतरी त्यांच्या हातावर टिपावं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy