पावसाची दस्तक
पावसाची दस्तक
सकाळपासूनचं सगळं कसं व्यवस्थित सुरू असतं नाही का?
म्हणजे हे सूर्याचं उगवणं,
ही थोडीशी उकाडा घेऊन अस्वस्थ करणारी दुपार,
मधेचं साडेचार - पाचच्या दरम्यान येणारी एखादी वार्याची एक झुळूक,
आणि हळू हळू नभांत आपले रंग उधळित तो मावळतीला जाणारा सूर्य,
आणि हळू हळू मगं त्या रात्रीचे अवतरणे,
सारे कसे ठरलेले असते नाही का या दिवसाचे?
आणि अशातच सूर्य मावळतीला गेल्यावर,
चंद्र येण्याऐवजी जेव्हा ते काळेकुट्ट ढगं आकाशांत गर्दी करू लागतातं ना तेव्हा सारेचं काही बिघडल्यासारखे भासते क्षणभरं.
अशा अवेळी हे ढगांचे येणे,
आणि या पावसाने दस्तक देणे!
कुठेतरी काहीतरी सुरू असलेले सारे काही स्तब्ध होऊन जाते त्या क्षणी.
हा पाऊस आपल्याला थांबायला भाग पाडतो.
हा पाऊस आपल्याला रेंगाळून ठेवतो.
मगं आपल्या ही नकळतं मनांत आठवणींचे एक गीत तयार होते.
अलगदं ओठांवर ओळी येऊन उभ्या राहतातं,
आणि आपण अडकतो चं या पावसांत नाही म्हटले तरी.
अशावेळी जाणवते की,
खरोखरं एक क्षण ही पुरेसा असतो ना,
आपल्या स्थिर मनाला उद्ध्वस्त करायला??
मग काही वेळा तो क्षण अशा अवेळी येणाऱ्या,
पावसाची दस्तक घेऊन येतो...

