दिनक्रम
दिनक्रम
विसरून दुःख मी,
सुखाला करते जवळ,
मन असेल निराश तर,
वर्तमानात विसावते...
जीवनातील चढ उतार,
रोजच मी बघते,
कठिण काळ हसुन,
भुतकाळात गोवते....
दिशा रोज नवी,
मी जगण्यात शोधते,
सुखर होते जगणे,
वेदनेला हळूच जाळते....
कठीण नाही काही,
मनास समजावते,
सुखर होतो दिन,
मग मनही सुखावते.....
