पुरे तुझे बहाणे जीवा
पुरे तुझे बहाणे जीवा
शोधुनी जग थकले
भाग्य अभागी भंगले
जन्माची दुःखे पांगले
जीव एकाकी ते उरले
असुनी साऱ्यात एकली
शब्द ओठात विरले
मागता सोबतीचे दुवे
एकांती श्वास हे उरले
पुरे तूझे बहाणे जीवा
जीव श्वासास ना मुकले
परी जीणं परकं करुनी
जगण जिव्हारी लागले
कारण जगण्यास भेटे ना
जीवास मन ते कळेना
छळ अबोल भावनेचा
जगण्याचा बहाणा मिळेना
पुरे तूझे बहाणे रे मना
कळुनी तुला काही कळेना
सख्ख्या जीवाची ही लाही
मनाची स्पंदने तुला उमजेना
एकांत देगा मज देवा
जगाच्या बाजारातूनी
वेदनांच्या कोलाहलास
बोलण्याची मती दे देवा
पुरे बहाणे तूझे देवा
जगाच्या या गर्दितली
अस्तिवाची ती झळ
तुजपाशी ना पोहचली
निःशब्द होते श्वास
मुके जाहले जे बोल
होतात का तुज वेदना
कळे ना तुला अबोला
