ओढ माहेरची
ओढ माहेरची
नवरा म्हणे अशी कशी
ओढ तुला माहेरची.
इतकी वर्षे लोटलीत बरी,
अजूनही हौस ती भारी।
जातेच म्हणते माहेरी,
घालवल की लहानपण तरी।
नवरा म्हणे अशी कशी
ओढ तुला माहेरची.
धर्मपत्नी बनुन आनली,
दाखल्यांची रटच लावली।
पुरवा म्हणे हट्ट सगळी,
नाहीत मी माहेरला चालली।
नवरा म्हणे अशी कशी
ओढ तुला माहेरची.
नव होत तेव्हा समजू शकतो,
नवी माणसजागा मान्य करतो।
राणीसाहेबांच्या इच्छा पूर्ण करतो,
कुठे का मी कमी पडतो।
नवरा म्हणे अशी कशी
ओढ तुला माहेरची.
बायको म्हणते.......
ऐकाना धनी उगाच लावू मनी,
बाईची जात नाहीन तुम्ही।
काय कस सोसतो आम्ही,
येईना कधीच तुमच्या ध्यानी मनी।
माहेरी सरल जरी बालपण
सोडून आले मी हक्काचे अंगण।
असण्याने माझ्या घरात दणदण,
वाट बघत माझ्या माहेरच कुंपण।
जरी राणी मी लाडाची तुमची,
राजकुमारी पहिली आईबाबाची।
लाडकी ताई भांडखोर भावांची
आठवण येईल ना माझ्या माहेरची।
मान्य उमजने कठिण आता,
ऐकून शब्द ठणकेल माथा।
फुटेल पाझर, लोचनांना धारा
लेक जाईल तुमची सासरा।
