दिवास्वप्न
दिवास्वप्न
मी पाहिले स्वप्न
सखी तुझ्या भेटीचे |
समुद्र किनाऱ्यावर
गोड गोड मिठीचे ||१||
मी पाहिले स्वप्न
होतो तुझ्या कुशीत |
चांदण्या त्या रात्री
होतो मी खुशीत ||२||
मी पाहिले स्वप्न
निळ्या लाटेचे गीत |
मंद त्या चांदण्या
चंद्रावर करती प्रीत ||३||
मी पाहिले स्वप्न
गंध तुझ्या श्वासाचा |
विळखा गळ्याभोवती
कोमल तुझ्या हाताचा ||४||
मी पाहिले स्वप्न
झालो होतो मी धुंद |
जशी संपत होती रात्र
वारा वाहत होता मंद ||५||
स्वप्न माझे तुटल्यावर
तरंगत होते मनी स्वप्न |
वाटे असेच पडून रहावे
पुन्हा पाहण्या दिवास्वप्न ||६||

