STORYMIRROR

Deore Vaishali

Fantasy Inspirational

3  

Deore Vaishali

Fantasy Inspirational

जीवनाचे कपाट

जीवनाचे कपाट

1 min
204

जीवनात अनेक कप्पे,

भरलेल्या कपाटासारखी,

वेगवेगळ्या कप्यात होते,

सोबतीचे नानाविध रिपू‌ ...


दुःख विरह,अश्रू एकात,

दुसर्यांत आनंदाचे क्षण,

कौतुक, अभिमान तिसऱ्यात,

चौथ्यात नाराजी, निंदा ,अपमान,...


हितचिंतक, प्रेमाचे जण पाचव्यात,

मिञ मैञिणी ,मस्ती सहाव्यात,

सातव्या कप्यात आवड निवड सोबतीला,

चोर कप्पा अनमोल गुपिते बहू त्यात...


सारे रिपू लागतात वावरताना ह्या जगात,

 जपावे लागतात सारे जीवन जगताना,

आवरून ठेवले मग वेगवेगळ्या कप्प्यात,

गरजेचेच ते जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy