जगातील शाळा
जगातील शाळा


ऑनलाइनची भरते दररोज शाळा
मोबाईल वर बसून येतो कंटाळा
सारखे बघून दुखतात डोळे
धोका आरोग्याचा कधी ना टळे
नसे प्रयोगशाळा,नसे प्रयोग
निष्कर्ष नाही सत्याचा त्याग
सोपे शिक्षण केले कठीण
शिक्षकाविना शाळा मृत्यूसमान
प्रेम नाही इथे नसे जिव्हाळा
एकाकी जीवन मोबाइल सोबतीला
कुणाशी बोलावे आम्हा कळेना
व्यथा आमची कुणी ऐकेणा
कुणाला सांगावे आम्हां कळेना
आमचे मन तुम्ही समजून घ्याना
नाजुक आहे आमचे डोळे
तरुणपणात आंम्ही होऊ आंधळे
नाजुक आमचे इवलेसे हात
लिहून,लिहून फार दुखतात
ताणतणाव कमी वयात
आ
युष्य सरेल कमी काळात
जीवन आमचे केले बंदिवान
मोकळे जगणे झाले कठीण
खेळायचे दिवस मोबाईल हातात
शिक्षण आमचे चाले शिस्तीत
जीवन आमचे झाले भयान
श्वास घेणे झाले कठीण
मोबाईल झाला जीव की प्राण
आरोग्य आमचे गेले बिघडून
स्पर्श मिळेना वृक्ष वेलींचा
सुंदर फुले गोजिरी पक्षांचा
चार भिंतीत रमते शिक्षण
जीवंत मनाशिवाय नाही जीवन
खेळायला नसे इथे मैदान
कसा जाईल बौद्धीक ताण
आरोग्य चालले आता धोक्यात
जीव जाईल थोड्या काळात
संस्कार,संस्कृती इथे संपेल
स्वैराचार जगात सतत माजेल
राष्ट्रभक्ती,बंधूभाव इथे नसेल
कुटूंब कल्याण भावना संपेल