जगातील बदल----जागतिकीकरण
जगातील बदल----जागतिकीकरण
औद्योगिक क्रांतीची आली जोरदार लाट........
प्रगतीशील मानवाने केली नवनवीन क्षितीजे पार....
आजूबाजूच्या देशांत डोकावलं तर.....त्याला दिसलं नवीन यांत्रिक युग...... तसेच......गुगल.....इंटरनेट....मोबाईल......
त्याला लागला नाविन्याचा ध्यास........
देशादेशांत सुरु होताच चलनवलन........
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ......फुलली....
बहरली....नवनवीन वस्तूंनी..
गुगल....इटरनेट. ..मोबाईलमुळे
एका क्लिकवर सगळं विश्व आलं मुठीत......
जगातील हवी ती माहिती..... हवी तेव्हा.....हवी तिथे.....
मानव गुंगला मोबाईलमधे इतका की....त्याला दिसेना समोरचा माणूस....
माणसाची सुखदुःख समजेनातच माणसाला....
माणूसकीही विसरला आजचा माणूस.....
सहलीचा ,निसर्गाचा आनंद त्याला घेता येईना मुक्तपणे...
सारखे फोटो....फोटो...फोटोच
मोबाईलमधे....
सेल्फीने तर घातला ..धुमाकूळ
सेल्फीपायी गमावले कितीकांनी जीव...
जागतिकीकरणात आली नवीन यंत्रे...रंगीबेरंगी वस्तू...काही टिकाऊ....तर काही टाकाऊ..
प्रगतीनं वेळ ...कष्ट ...पैसा वाचवला....पण बेरोजगारीचा राक्षस पुढ्यात उभा ठाकला !!
जागतिकीकरण आलं....पण फायदे.... तोटे...हातात हात घालूनच !!
