STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

जग जावे विसरुन

जग जावे विसरुन

1 min
337

सान कोवळे बालक

हसे गोड मुरकून

खळी गोड गालावरी

जग जावे विसरुन


थंडगार गारव्यात

आई घेई लपेटून

ऊबदार रजईत

जग जावे विसरुन


सप्तसूर नर्तनात

जाई भान हरपून

वादकाच्या कलेमधे

जग जावे विसरुन


कला रेखी चित्रकार

त्याचे सर्वस्व अर्पून

नसे जाण क्षुधेचीही

जग जावे विसरुन


कसे ईश्वरा निर्मिले

जग मायाब्रम्हातून

वाटे क्षणिक मनूला

जग जावे विसरुन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract